कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

    19-Mar-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray Shinde group
 (Image Source : Internet)
रत्नागिरी:
कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे गटाने आपली ताकद वाढवली आहे. माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात स्वतः पोस्ट करत माहिती दिली.
 
दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले.
कोकणात शिवसेना वाढत आहे. कोकणात एक जागा वगळता सर्वच जागांवर महायुतीचे आमदार जिंकले आहे. शिवसेनेचे दोन कदम कोकणात एकत्र आल्याने आता दापोलीत शिवसेनेची ताकद वाढेल असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक आणि छत्रपती संभाजीनगर व सांगली जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असेही शिंदे म्हणाले.