(Image Source : Internet)
नागपूर :
औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन सोमवारी १७ मार्चदरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यानंतर नागपूरच्या महाल आणि हंसापुरी भागात मोठा हिंसाचार घडला. मात्र या संपूर्ण दंगलीचा मास्टरमाईंड कोण याचा पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे.
माहितीनुसार, नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदा समोर आले आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असून त्याला पोलिसांनी अटक केली.