(Image Source : Internet)
मुंबई :
औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापले असताना सोमवारी याच मुद्यावरुन नागपुरात दोन गटात हिंसक संघर्ष झाला. काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली. वाहनांची जाळपोळ केली. पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर हल्लेही करण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला.
नागपूरात जे काही घडलं, त्यावर सरकारची भूमिका काय? पोलिसांच मनोबल कसं वाढवणार? या प्रश्नावर उत्तर देताना कदम म्हणाले की,नागपुरात ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार. कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. पोलिसांच मनोबल कमी होता कामा नये. ही आमची जबाबदारी आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर घटनेचे व्हिडिओ व्हायरल करू नका-
नागपूर हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल करुन काहीही साध्य होणार नाही. आपणच आपल्या महाराष्ट्राची बदनामी देशात करत आहोत. माझी विनंती आहे की, हे थांबलं पाहिजे. फेसबुक, इन्स्टाग्राम कंट्रोल करता येतं, Whatsapp वर व्हायरल होणारे व्हिडिओ कंट्रोल करणं सायबरला देखील कठीण होत असल्याचे कदम म्हणाले.