(Image Source : Internet)
मुंबई :
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने घटस्फोट देण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिलासा नाकारला होता. मात्र, चहल आणि धनश्री यांनी एकत्रितपणे उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, गुरुवारी 20 मार्चला त्यांना अधिकृतरित्या घटस्फोट मंजूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोशल मीडियावर चहल घटस्फोटानंतर पत्नी धनश्री वर्माला 60 कोटी रुपयांची पोटगी देणार अशी अफवा पसरली होती, मात्र प्रत्यक्षात युझवेंद्र चहल 4 कोटी 75 लाख रुपये पोटगी म्हणून देणार आहे. यातील 2 कोटी 37 लाख 55 हजार रुपये यापूर्वीच धनश्रीला दिले गेले आहेत. उर्वरित रक्कम अद्याप दिली नाही, तर न्यायालयाच्या निर्देशांचे पालन झाले नाही, असे मानले जाणार आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा 8 ऑगस्ट 2020 रोजी साखरपुडा झाला होता. त्यानंतर 22 डिसेंबर 2020 रोजी त्यांचा भारतीय पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. आता ते परस्पर सहमतीने घटस्फोट घेत आहेत.