एमपीएससी भरतीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

    19-Mar-2025
Total Views |
 
CM Fadnavis MPSC
 (Image Source : Internet)
नागपूर :
एमपीएससी (MPSC) परीक्षा पार पडल्यानंतर निकाल आणि नियुक्ती प्रक्रियेत मोठा विलंब होत असल्याची तक्रार विद्यार्थी वारंवार करत असतात. आता याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. MPSC मंडळात सध्या तीन पदे रिक्त आहेत, ती तात्काळ भरली जाणार असून, भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
 
इतकेच नाही तर MPSC परीक्षेला UPSCप्रमाणे वार्षिक कॅलेंडर मिळणार असून, परीक्षेची प्रक्रिया डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात होणार आहे. काही घटकांचा याला विरोध असला तरी राज्य सरकार हा विरोध मान्य करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
 
MPSC बाबत 'हे' होणार बदल-
– UPSCप्रमाणे MPSC परीक्षेचे वार्षिक कॅलेंडर तयार होणार
.– MPSC परीक्षा डिस्क्रीप्टिव्ह स्वरूपात होणार
.– रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचा वेग वाढवला जाणार.
– मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, MPSC स्वायत्त संस्था असली तरी सरकार परीक्षार्थींच्या हिताचा विचार करून आवश्यक सुधारणा करणार आहे.
 
दरम्यान विधानसभेत आमदार विक्रम काळे यांनी MPSCच्या निवड प्रक्रियेत मनुष्यबळ कमी असल्यामुळे नियुक्ती होत नाही, तसेच काही व्यवहार होत असल्याचे आरोप केले. यावर मुख्यमंत्र्यांनी MPSCची प्रक्रिया पारदर्शक ठेवली जाईल आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे फडणवीस म्हणाले. MPSCच्या प्रक्रियेबाबत सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये असलेला रोष लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.