Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा संघर्ष सुरू होण्याची शक्यता उभी राहिली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोकणातील एका वरिष्ठ नेत्याला संधी मिळेल, असा गृहितक राखला होता, पण अचानक आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्याने या नेत्यात नाराजी पसरली आहे.
या नेत्याने वर्षानुवर्षे ठाकरे गटाला निष्ठा दाखवली असून शिंदे बंडाच्या काळातही मातोश्रीला साथ दिली होती. पण आता विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे यांना प्राधान्य दिले जात असल्याने त्यांच्यामध्ये रोष वाढला आहे.
या नेत्याचा आणि त्याच्या समर्थकांचा पक्ष भाजपमध्ये जाण्याची चर्चा जोर धरत असून सुमारे दहा आमदारांसह ते प्रवेशासाठी सज्ज आहेत, अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाने या आमदारांना भाजपने प्रवेश देऊ नये, तर त्यांनी स्वतःच्या गटात यावे, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे भाजपमध्येही या विषयावर मतभेद सुरू झाले आहेत. अंतिम निर्णय दिल्लीहून होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपदाचा संघर्ष पुढे कसा पुढे सरकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.