क्रिकेटर स्मृती-पलाश मुच्छल यांचा लग्न रद्द; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

    08-Dec-2025
Total Views |
 
Cricketer Smriti Palash Muchhal
 Image Source:(Internet)
मुंबई:
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकप्तान स्मृती (Smriti) मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छलयांचे लग्न रद्द झाले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाची तारीख ७ डिसेंबर होती, पण स्मृतीने या दिवशी इंस्टाग्रामवरून लग्न रद्द असल्याची माहिती दिली.
 
पलाशनेही सोशल मीडियावरून रोमँटिक प्रपोजलचा व्हिडिओ, विश्वचषक साजरा करताना घेतलेले व्हिडिओ आणि स्मृतीच्या नावाचा टॅटू दाखवणारी पोस्ट हटवली आहे. स्मृतीनेही पलाशसहचे फोटो काढले आणि पलाशची बहीण पलक मुच्छल याला अनफॉलो केले आहे.
 
दोघांनी चाहत्यांना आणि पत्रकारांना त्यांच्या खासगी आयुष्याचा सन्मान करण्याची विनंती केली आहे, पण ही बातमी चाहत्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण करत आहे.