Image Source:(Internet)
पुणे:
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेतला आहे. नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुका पार पडल्या असतानाही पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्रपणे ४१ प्रभागांमध्ये उमेदवार उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
‘एकला चलो रे’चा जयघोष-
शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. शिवसेना मनसे युती न झाल्यास १६५ जागांसाठी स्वतंत्र लढाई लढण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारीसाठी अर्जांची फी ५00 रुपये असून, अर्जासोबत १० हजार रुपये शुल्कदेखील आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, सामाजिक कामगिरी आणि पक्षातील सक्रिय सहभाग या बाबतीतही कडक तपासणी होणार आहे.
मनसेशी युती नाही; महाविकास आघाडीबाबत अजूनही धुंदरी-
पुण्यात मनसेसोबत किंवा महाविकास आघाडीसोबत युती होण्याबाबत कोणतीही निश्चिती नसल्याने शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीचे राजकारण अधिकच तापलेले जाणवते.
दरम्यान या नव्या धोरणामुळे शिवसेनेच्या उद्धव गटाला पुणे महापालिका निवडणुकीत मजबूत प्रताप मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, यामुळे शिवसेना-मनसे युतीबाबतही राजकीय तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या राजकीय गतिरोधावर कशी भूमिका उचलली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.