निवडणूक निकाल उशिरा; आयोगाच्या चुकांमुळे विलंब, महसूल मंत्र्यांची नाराजी

    03-Dec-2025
Total Views |
 
revenue minister Bawankule
 Image Source:(Internet)
मुंबई :
नगरपरिषद आणि पंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये अनपेक्षित विलंब दिसून येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी निवडणूक आयोगाच्या चुकांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, निकाल आता २१ डिसेंबरपर्यंत जाहीर होतील.
 
आधी निकाल ३ डिसेंबरला जाहीर होण्याची तयारी होती, पण न्यायालयाने काही ठिकाणी होणाऱ्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत निकाल पुढे ढकलण्याचा आदेश दिला. बावनकुळे म्हणाले की, फक्त प्रभावित भागांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत होत्या, पण संपूर्ण भागासाठी निकाल उशिरा झाल्याने हा नकारात्मक परिणाम झाला आहे.
 
यामुळे उमेदवारांमध्ये संताप वाढला असून, विरोधकांनीही आयोगावर प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने आयोगाशी अनेकदा संपर्क साधला, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी नाराजी बावनकुळे यांनी व्यक्त केली.
 
भविष्यात मोठ्या निवडणुकीत अशा चुका होऊ नयेत म्हणून आयोगाने सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगानेही या प्रकरणाचा अभ्यास सुरू केला आहे.
 
विरोधकांच्या आरोपांना बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले की, निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था असून कोणताही बाह्य दबाव त्यावर नाही. त्यांनी मतदारांनी उत्साहाने मतदान केले आणि महायुती-भाजपला मोठा पाठिंबा मिळाला, असेही ते म्हणाले.