दिल्ली कार स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडी वाढली; एनआयएची पुढील चौकशी सुरु

    03-Dec-2025
Total Views |
 
Custody extended
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
दिल्लीत झालेल्या भीषण कार स्फोटात १५ लोकांचा मृत्यू झाला, त्यानंतर मुख्य आरोपी जसीर (Jasir) बिलाल वानी याला एनआयएने अटक केली. आता त्याच्या कोठडीची मुदत आणखी ७ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. हा निर्णय दिल्लीच्या विशेष न्यायालयाने दिला आहे.
 
जसीर बिलाल वानी हा जम्मू काश्मीरमधील अनंतनागचा रहिवासी असून त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. तो लाल किल्ल्याजवळील कार स्फोटासाठी ड्रोनमध्ये स्फोटके लपवण्याचा तांत्रिक बदल करण्याच्या योजना आखणारा असून, रॉकेट बनवण्यामध्ये 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल'ला मदत केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. तसेच, देशातील विविध दहशतवादी कारवायांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
 
एनआयएने सांगितले आहे की, जसीर हा डॉ. उमर उन नबीचा जवळचा सहकारी असून दोघांनी मिळून हा स्फोट योजला होता. १७ नोव्हेंबरला श्रीनगरमध्ये अटक झालेल्या जसीरने चौकशीत मान्य केले की, डॉ. उमरने त्याचे ब्रेनवॉशिंग केले आणि तो आत्मघाती बॉम्बरसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इस्लाममध्ये आत्महत्या निषिद्ध असल्यामुळे जसीरने आत्मघाती बॉम्बरसाठी नकार दिला.
 
या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, एनआयए पुढील चौकशी करत आहे.
.