नागपूर मनपा निवडणूक:प्रभाग 21 मधून आभा पांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन

    26-Dec-2025
Total Views |
 
Abha Pandey
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापू लागले असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा आभा पांडे (Abha Pandey) यांनी प्रभाग क्रमांक 21 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
शुक्रवारी अर्ज दाखल करताना आभा पांडे यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थकांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन केले. रॅली आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला असून यामुळे निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.
 
नागपूर मनपा निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत शांतता होती, मात्र अंतिम तारखा जवळ येताच उमेदवार रिंगणात उतरू लागले आहेत. आभा पांडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 21 मधील लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना आभा पांडे म्हणाल्या की, प्रशासक राज असतानाही त्यांनी आपल्या प्रभागासाठी निधी मिळवून विविध विकासकामे पूर्ण केली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून पुढील काळातही विकासाची गती कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.