नगराध्यक्षांना पगार नाही, पण मानधन-भत्त्यांत भरभराट!

    22-Dec-2025
Total Views |
 
Honorarium
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्षांना (Mayor) पगाराऐवजी मानधन व भत्ते दिले जात आहेत. राज्यातील नगरपरिषदा तीन वर्गांमध्ये विभागल्या आहेत – अ, ब आणि क. यानुसार मानधन आणि अतिथ्य भत्त्याची रक्कम ठरते.
 
अ वर्ग नगरपरिषद:
नगराध्यक्षांना मानधन २५,००० आणि अतिथ्य भत्ता ३६,००० मिळतो.
ब वर्ग:
मानधन २०,००० आणि भत्ता २४,०००.
क वर्ग:
मानधन १५,००० आणि अतिथ्य भत्ता १८,००० इतका दिला जातो.
 
अतिथ्य भत्ता पाहुण्यांसाठी जेवण, निवास आणि इतर सोयीसुविधा यासाठी दिला जातो. शिवाय, नगराध्यक्षांना मीटिंग झालेल्या दिवशी १०० मीटिंग भत्ता देखील मिळतो.
 
हे सर्व मानधन आणि भत्ते नगरपरिषदेच्या निधीतून दिले जातात, ज्यात पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर करांतून जमा होणारा निधी असतो. निधीच्या परिस्थितीनुसार या रकमा ठरवल्या जातात.
 
या पध्दतीने नगराध्यक्षांचा सेवाभाव सन्मानित करण्याचा प्रयत्न केला जात असून, पगाराऐवजी मानधन-भत्ते देऊन त्यांचा आर्थिक आधार मजबूत केला जात आहे.