मुंबई महापालिका निवडणूक;मलिकांचा विरोध राष्ट्रवादी-भाजप युतीला मुंबईत मोठा धक्का?

    16-Dec-2025
Total Views |
 
NCP BJP alliance
 Image Source:(Internet)
नागपूर :
निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या (Municipal Corporation elections) तारखा जाहीर करताच राजकीय पक्षांमध्ये शिडी फिरू लागली आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युतीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत तणावाची झळ लागली आहे.
 
भाजप-शिंदे गटाच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण न देण्याचा निर्णय नवाब मलिकांच्या विरोधामुळे घेतल्याचे समजते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवाब मलिकांचा विरोध वाढल्याने युतीसाठी मोठा आव्हान निर्माण झाला आहे.
 
भाजप नवाब मलिकांशिवायच निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नवाब मलिकांसह निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे महायुतीची वाटचाल गुंतागुंतीची झाली आहे.
 
मुंबईत महायुतीत तडा पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गट स्वतंत्रपणे लढणार की राष्ट्रवादीही युतीत राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
राजकीय क्षेत्रात नवाब मलिकांच्या भूमिकेवरून महत्त्वपूर्ण फेरफार होण्याची शक्यता वाढली असून महायुतीत पुढील काळात काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.