Image Source;(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रात थंडीचा (Cold) कडाका वाढत असून, पुढील ४८ तासांत आणखी थंडी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेकडून शीतलहरी राज्याकडे सरकताना तापमानात जोरदार घसरण झाली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. सकाळी धुके आणि थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.
पंजाब, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा थंडी वाढली असून, महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नाशिकसह मराठवाडा आणि विदर्भात थंडीचे प्रमाण विशेष वाढले आहे. राज्यातील जिल्हे जसे की छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, अकोला, वाशिम, सातारा, भंडारा, गोदिंया आणि नागपूर या भागांमध्ये थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे.
मालकांसाठी ही थंडी चिंता वाढवणारी ठरली आहे. जेऊरमध्ये पारा ५ अंश सेल्सिअस, परभणीत ५.५ अंश आणि निफाडमध्ये ५.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. यामुळे शाळा सुरू होण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून, शाळा सुरू होण्याचा वेळ पुढे ढकलण्यात आला आहे.
केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांत मुसळधार पावसामुळे थंडीचे प्रमाण कमी असले तरी, महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या सुरूवातीला झालेल्या पावसामुळे आता डिसेंबरमध्ये थंडी अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
थंडी वाढल्याने लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. थंडी, खोकला आणि ताप यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली असून, विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आजारपण असलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याचा अलर्ट:
पुढील ४८ तासांत तापमानात घट होण्याची शक्यता
अनेक जिल्ह्यांत सकाळी आणि रात्री तापमान खाल्ल्या पातळीवर जाण्याची शक्यता
धुक्यामुळे वाहनचालनात काळजी घेण्याचा सल्ला
आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन
थंडीच्या या लाटेमुळे नागरिकांनी योग्य वेषभूषा करून, गरमपाणी व सेवन करून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, आरोग्याच्या दृष्टीने गरम अन्न आणि पुरेशा विश्रांतीवर भर देण्याचेही महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.