नागपुरात बिबट्याचा थरारक रेस्क्यू; वन विभागाची गाडी पडली बंद, लोकांनी ढकलून केली मदत

    10-Dec-2025
Total Views |
 
leopard in Nagpur
 Image Source:(Internet)
नागपुर :
पारडी परिसरातील शिवनगर भागातून बिबट्याला (Leopard) बेशुद्ध करून वन विभागाने मोठा प्रयत्न केला, पण रेस्क्यूसाठी वापरलेली गाडी अचानक बंद पडली. वनकर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी गाडी ढकलून पुढे नेली, आणि नंतर दुसरे वाहन बोलावून बिबट्याला रेस्क्यू सेंटरपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले.
 
वन विभागाच्या टीमने थरारक ऑपरेशन करत बिबट्याच्या मुसक्या आवळल्या. एक डार्ट मारल्यावर भिंतीवर बसलेला बिबट्या 10-12 फूट उंचीवरून खाली कोसळला, त्यानंतर त्याला रेस्क्यू केंद्रात नेण्यात आले.
 
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. वनमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत बिबट्यासंबंधित माहिती दिली आणि विदर्भातील आमदारांची बैठक बोलवली जाईल, अशी माहिती दिली.
 
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या वेशात विधानसभेत येऊन या विषयाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “नसबंदीशिवाय बिबट्याचा प्रश्न सुटणार नाही.” तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पक्षविरहित आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.