Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने दिलासादायक योजना सुरू केली आहे. ‘इसेन्शिअल किट (Essential Kit ) योजना’ अंतर्गत पात्र मजुरांना घरासाठी लागणाऱ्या १० आवश्यक वस्तूंचा संच पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे.
या किटमध्ये दररोजच्या वापरातील वस्तू — पत्र्याची पेटी, ब्लँकेट, बेडशीट, धान्य डब्बे, वॉटर प्युरिफायर अशा अनेक वस्तूंचा समावेश असून, कामगार कुटुंबांना यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
किटमधील वस्तूंची यादी-
पत्र्याची पेटी
प्लास्टिक स्टूल
धान्य ठेवण्यासाठी कोठी
किलो क्षमतेचा धान्य डब्बा
बेडशीट (चादर)
ब्लँकेट (कांबळे)
साखर ठेवण्यासाठी डब्बा
चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा
दुसरी चादर
१८ लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायरअर्ज कसा कराल?
१. Google वर “Maha BOCW Profile Login” शोधा.
२. अधिकृत लिंकवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका.
३. मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.
४. लॉगिन झाल्यावर तुमचा BOCW Registration Number दिसेल, तो जतन करा.
५. त्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर परत जा आणि तो क्रमांक वापरून पुन्हा लॉगिन करा.
६. तुमच्या जिल्ह्यातील शिबिर (Camp) आणि उपलब्ध अपॉइंटमेंट तारीख निवडा.
७. ‘Print Appointment’ वर क्लिक करून पावती डाउनलोड किंवा प्रिंट करा.
८. ठरलेल्या दिवशी शिबिर स्थळी आधार कार्ड व अपॉइंटमेंट पावतीसह जा.
९. तिथेच तुम्हाला १० वस्तूंचा इसेन्शिअल किट संच मोफत मिळेल.
जर अपॉइंटमेंट स्लॉट भरले असतील, तर १५ दिवसांनंतर पुन्हा प्रयत्न करता येईल.