Image Source:(Internet)
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात मोठा भूकंप झाला असून जिल्हाध्यक्ष सचिन पोटे (Sachin Pote) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पोटे यांच्यासह अनेक ब्लॉक अध्यक्ष आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनीही पक्षाचा राजीनामा दिल्याने स्थानिक काँग्रेस संघटना गोंधळलेल्या परिस्थितीत सापडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून काँग्रेसला ठाणे जिल्ह्यात सतत धक्के बसत आहेत. अनेक पदाधिकारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असताना आता जिल्हाध्यक्ष पोटे यांच्या अचानक केलेल्या राजीनाम्यामुळे पक्षाचे अस्तित्वच डळमळीत झाल्याची चर्चा रंगली आहे.
पोटे यांनी राजीनामा देताना पक्षाच्या धोरणांनुसार हा निर्णय घेतल्याचे सांगितले असले तरी, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, पोटे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याची माहिती असून दोघांची अलीकडेच भेट झाल्याचेही समोर आले आहे.
सचिन पोटे आणि त्यांच्या समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे कल्याण-डोंबिवली काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.