मनमाड निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का; उमेदवार नितीन वाघमारे यांचे हृदयविकाराने निधन

    25-Nov-2025
Total Views |
 
Nitin Waghmare
 Image Source:(Internet)
मनमाड :
नगर परिषद निवडणुकीत तापलेल्या राजकीय वातावरणात ठाकरे गटासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार नितीन वाघमारे (Nitin Waghmare) यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही बातमी समजताच मनमाड शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
 
वाघमारे हे परिसरातील ओळखले जाणारे सक्रिय कार्यकर्ते होते. निवडणूक प्रचाराच्या धावपळीत असताना आलेल्या या काळाच्या झटक्याने ठाकरे गटाला मोठे नुकसान झाले आहे. नागरिक, स्थानिक नेते आणि सहकारी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून तसेच प्रत्यक्ष भेटून श्रद्धांजली अर्पण केली.
 
सुमारे नऊ वर्षांनंतर होणाऱ्या मनमाड नगर परिषद निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासह सर्वच प्रभागांमध्ये बहुरंगी लढत असून प्रत्येक ठिकाणी राजकीय गणितं बदलतायत. अशातच वाघमारे यांच्या अकस्मात मृत्यूमुळे प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणुकीच्या वातावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
या घटनेनंतर ठाकरे गटात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पुढील निर्णयांसाठी गटाच्या वरिष्ठ पातळीवर बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. नितीन वाघमारे यांच्या निधनाने मनमाड परिसरावर दुःखाचे सावट पसरले असून निवडणुकीच्या रणधुमाळीत ही घटना मोठी पोकळी निर्माण करून गेली आहे.