Image Source:(Internet)
नागपूर :
मुलीच्या (Girl) शिक्षणासाठी किंवा पुढील आयुष्यातील मोठ्या खर्चांसाठी सुरक्षित, स्थिर आणि खात्रीशीर गुंतवणूक शोधत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना हा सध्या उपलब्ध असलेला सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. केंद्र सरकार चालवणारी ही योजना पूर्णपणे सुरक्षित असून व्याजदर हमीदार आहे. 2025 साली योजनेचा व्याजदर 8.2% इतका निश्चित करण्यात आला आहे.
ही योजना मुलीच्या नावाने जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत खाते सुरु करण्याची मुभा देते. दरवर्षी जास्तीत जास्त1.5 लाख रक्कम जमा करता येते. शिक्षण, उच्च शिक्षण, करिअर किंवा विवाहासाठी निधी तयार करण्यासाठी लाखो पालक या योजनेचा फायदा घेत आहेत.
१५ वर्षे गुंतवणूक केल्यास किती मिळू शकते?
उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सलग 15 वर्षे दरवर्षी 1,50,000 इतकी रक्कम जमा केली, तर एकूण गुंतवणूक होते 22,50,000. मात्र खरी कमाल दाखवते ती चक्रवाढ व्याजाची ताकद!
या खात्यात 15 वर्षे पैसे जमा केल्यानंतर पुढील 6 वर्षे फक्त व्याज वाढत राहते, कारण खाते 21 वर्षांनीच परिपक्व होते. त्यामुळे अंतिम रक्कम प्रचंड वाढते.
गणितानुसार अंदाजे-
एकूण गुंतवणूक: 22,50,000
एकूण व्याज (8.2% कंपाउंडिंग): 49,32,119
मॅच्योरिटी रक्कम: सुमारे 71,82,119
म्हणजेच फक्त 22.5 लाख गुंतवून तुम्ही 21 वर्षांच्या शेवटी जवळपास 72 लाखांचे भविष्यनिर्मिती मूल्य तयार करू शकता.
ही योजना खास का?
सुकन्या समृद्धी योजना ही EEE (Exempt-Exempt-Exempt) प्रकारातील गुंतवणूक आहे. म्हणजेच:
जमा रक्कम 80C अंतर्गत करमुक्त
व्याजावर कोणताही कर नाही
मॅच्योरिटीची संपूर्ण रक्कमही टॅक्स-फ्री
याशिवाय कोणताही शेअर बाजाराचा धोका नाही, सरकारची संपूर्ण हमी आहे आणि व्याजदरही स्थिर मिळतो. अगदी 250 पासून खाते सुरु करता येत असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांनाही ही योजना सहज परवडते.