गोंदियात उमेदवारांची ‘कुंडली’ पाहूनच मतदान करा,नाहीतर...; प्रफुल्ल पटेलांचा इशारा

    21-Nov-2025
Total Views |
 
Praful Patel
 Image Source:(Internet)
गोंदिया :
गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मतदारांना धाडसी संदेश दिला आहे. आज गोंदियात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पटेल यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “उमेदवारांची कुंडली पाहूनच मतदान करा; चुकीची निवड झाली, तर पुढील काळात नगर परिषद विक्रीला जाण्यापासून कोणताही शक्ती वाचवू शकणार नाही.”
 
पटेल यांनी मागील कार्यकाळातील गैरव्यवहारांवर थेट प्रहार केला. काही पदाधिकाऱ्यांनी बोगस स्टॅम्प तयार करून गंभीर गैरकृत्ये केली असून, ढाई वर्षांच्या कारभारात अनेक अनियमितता जनतेसमोर उघड झाल्या आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे मतदारांनी डोळस निर्णय घेतला नाही, तर शहराचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
 
यावेळी कार्यकर्त्यांना उत्साह देत पटेल म्हणाले, “गोंदियाच्या विकासासाठी पक्षाने केलेल्या कामांची माहिती घराघरांत पोहोचवा. निवडणुकीत पूर्ण ताकदीने झोकून द्या, कारण योग्य उमेदवारांची निवड झाली, तर शहर पुढे जाईल; पण चुकीचा निर्णय गोंदियाला पुन्हा मागे खेचू शकतो.”
 
प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याची गोंदिया परिसरात जोरदार चर्चा सुरु असून, आगामी नगर परिषद निवडणुकीचे वातावरण आणखी चुरशीचे बनले आहे.