आयुष्मान कार्ड धारकांनो खबरदारी; ई-केवायसी न केल्यास थांबू शकतो उपचारांचा लाभ

    15-Nov-2025
Total Views |
 
Ayushman card
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
देशातील सर्वात व्यापक आणि लोकाभिमुख आरोग्य संरक्षण योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुष्मान (Ayushman) भारत योजनेबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. आता या सुविधेचा लाभ अविरत मिळावा यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य करत नवीन निर्देश जारी केले आहेत.
 
सरकारच्या म्हणण्यानुसार, ज्यांच्या नावावर आयुष्मान कार्ड आहे त्यांनी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी न झाल्यास कार्ड तात्पुरते बंद होऊ शकते, तसेच रुग्णालयात मिळणारी मोफत उपचार सेवा थांबण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर, लाभार्थ्याचे नाव योजनेच्या यादीतून वगळले जाण्याचाही धोका आहे.
 
सरकारने ई-केवायसीसाठी चार सोप्या पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत—
ओटीपी व्हेरिफिकेशन, फिंगरप्रिंट स्कॅन, आयरीस स्कॅन आणि फेस ऑथेंटिकेशन.
ही प्रक्रिया मोबाईलमधून किंवा जवळच्या सीएससी केंद्रातून काही मिनिटांत पूर्ण करता येते.
 
ई-केवायसी कशी कराल आणि आयुष्मान कार्ड कसे जनरेट कराल?
गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Ayushman Bharat Digital Mission / ABHA / Ayushman App डाउनलोड करा.
अॅप उघडून भाषा निवडा.
मोबाईल नंबर टाकून ओटीपी लॉगिन करा.
होम स्क्रीनवर दिसणाऱ्या “Ayushman Card” किंवा “Generate Ayushman Card” पर्यायावर क्लिक करा.
तिथे “Complete e-KYC” हा पर्याय निवडा.
आधार क्रमांक टाकून UIDAI कडून आलेला ओटीपी एंटर करा.
पडताळणी पूर्ण झाल्यावर ई-केवायसी यशस्वी होते.
 
त्यानंतर “Generate Ayushman Card” वर क्लिक करताच काही सेकंदांत तुमचे डिजिटल कार्ड तयार होते. दरम्यान सरकारने स्पष्ट केले आहे की, योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळत राहावा यासाठी प्रत्येक कार्डधारकाने ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी ई-केवायसी आता अपरिहार्य ठरणार आहे.