Image Source:(Internet)
पटना :
अत्यंत महत्त्वाच्या बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच राजकीय वातावरण तापले आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि अवघ्या काही तासांतच राज्यातील सत्तेचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) भक्कम आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
एक्झिट पोलमध्ये सूचित केलेल्या अंदाजांचीच पुनरावृत्ती होत असल्याचे दिसत असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने सुरुवातीच्या फेरीतच आघाडीचे वर्चस्व निर्माण केले आहे. आघाडीत जेडीयू, भाजप, लोजपा (रामविलास), एचयूएम आणि आरएलएम या पक्षांचा समावेश आहे.
प्राथमिक कल : एनडीए आघाडीवर, महाआघाडीची झुंज कायम
२४३ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत पहाटेपर्यंतचे कल असे—
एनडीए १६० जागांवर आघाडीवर,
महाआघाडी ७९ जागांवर पुढे,
इतर ४ जागांवर छोटे पक्ष किंवा अपक्ष उमेदवार आघाडीवर.
यामध्ये पक्षनिहाय स्थिती अशी—
भाजप ७० जागांवर आघाडीवर,
आरजेडी ५८ जागांवर जोरदार लढत देत आघाडीवर,
जेडीयू अनेक महत्त्वाच्या जागांवर पुढे.
मतमोजणीचा वेग वाढेल तसतसे हे आकडे बदलण्याची शक्यता आहे. तरीही सध्याच्या कलांवरून एनडीए पुन्हा एकदा बिहारच्या सत्तेच्या शर्यतीत मजबूत स्थितीत पोहोचत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.