नागपुरात धक्कादायक घटना; सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर चार महिलांचा मृत्यू, लतामंगेशकर रुग्णालयात खळबळ!

    01-Nov-2025
Total Views |
 
Lata Mangeshkar Hospital in Nagpur
 Image Source:(Internet)
नागपूर :
शहरातील लतामंगेशकर रुग्णालयात (Lata Mangeshkar Hospital) घडलेली एक गंभीर घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मागील काही दिवसांत या रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर चार महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृत्यूंमुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
या सलग मृत्यूंमुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. संबंधित रुग्णालयात नेमकं काय घडत आहे, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, मृत महिलांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी निष्पक्ष तपास आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
 
या घटनेनंतर आरोग्य विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली असून शस्त्रक्रियेत काही त्रुटी झाल्या का, औषधोपचारात बेपर्वाई झाली का, याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत रुग्णालय प्रशासनावर दबाव वाढत आहे.