Image Source:(Internet)
नवी दिल्ली:
शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ यावरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज निकाल लागू शकतो. सर्वोच्च न्यायालयात आज (8 ऑक्टोबर) या प्रकरणाची अंतिम आणि महत्त्वाची सुनावणी होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वकील असीम सरोदे यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र, या निर्णयाला विरोध करत उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यांचा दावा आहे की, मूळ पक्ष आणि त्याची ओळख त्यांच्या गटाशीच जोडलेली आहे, त्यामुळे आयोगाचा निर्णय रद्द करावा.
जुलै महिन्यात दाखल करण्यात आलेल्या अंतरिम याचिकेत ठाकरे गटाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई करावी, अशी मागणी केली होती.
पूर्वीच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी या वादाचा निकाल लवकरच लागेल, असे संकेत दिले होते. ही सुनावणी मूळतः 20 ऑगस्टला होणार होती; मात्र राष्ट्रपतींकडून राज्यपाल आणि केंद्र सरकारच्या विधेयकांबाबत सल्ला मागवण्यात आल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली होती.
आता पुन्हा आज सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा ऐरणीवर आला असून, आजचा दिवस ठरणार आहे