पवई अपहरण प्रकरण; आरोपी रोहित आर्यचा पोलिस चकमकीत मृत्यू

    30-Oct-2025
Total Views |
 
Powai kidnapping case
 Image Source:(Internet)
मुंबई :
पवईतील (Powai) ओलीसनाट्यानंतर अखेर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत आरोपी रोहित आर्यचा शेवट केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत १७ मुलांची सुखरूप सुटका केली, मात्र या कारवाईदरम्यान आरोपीने प्रतिकार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्य गंभीर जखमी झाला.
 
त्याला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर पवई परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
 
पोलिसांच्या या तत्परतेमुळे ओलीस ठेवलेली सर्व मुलं सुरक्षित आहेत, मात्र आरोपीचा शेवट चकमकीत झाला आहे.