Image Source:(Internet)
मुंबई:
शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. या वेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा होत असताना शिंदेंनी म्हटले की कोण कोणाशी संपर्क साधतोय, याची काळजी करू नका; योग्यवेळी सर्वांचा हिशोब घेतला जाईल.
पण यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, “मुंबईतील मराठी माणसाला बाहेर ढकलण्याचा विडा अमित शहांनी उचलला आहे. अडानीसारख्या उद्योगपतींना मुंबई विकायचा चंग घेतला आहे. आणि त्याच अमित शहाच्या पाठीशी एकनाथ शिंदे हे जोडेपुसे आहेत.”
राऊतांनी शिंदेंवर आरोप करत सांगितले की, “एकनाथ शिंदे हे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया किंवा बॅरिस्टर पै सारखे नाहीत. शिवसेना नावाने त्यांनी सुरु केलेली कंपनी खोटी आहे. भविष्यात सरकार बदलल्यावर त्या कंपनीच्या सर्व चौकश्या होणार आहेत.”
त्यांनी पुढे म्हटले की, “मराठी माणसांचा हक्क आणि निष्ठा ठाकऱ्यांशी आहे. पण मुंबईत अमित शहा आणि त्यांच्या पलीकडील उद्योगपतींच्या सत्तेच्या मदतीने राजकारण चालवण्याचा प्रयत्न सुरु आहे, आणि त्याचाच भाग शिंदे आहेत. जर त्यांना मराठी माणसाची खरी कदर नसली, तर त्यांनी मराठी लोकांबद्दल काहीही बोलू नये.”
राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्या उद्धव ठाकरे विरोधी वक्तव्यांना प्रत्युत्तर देत सांगितले, उद्धव ठाकरे हे कटप्रमुख आहेत; आमच्या सहकार्यामुळे एकनाथ शिंदे नेते झाले आहेत. आज एक रिक्षावाला 5 लाख कोटींचा मालक बनला आहे, हा उद्धव ठाकरे आणि आमच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले. त्यांना स्वतःवर आत्मपरीक्षण करायला हवे.