नागपुरात घरगुती कलहातून पित्याचा खून; आरोपी मुलाने केले पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण!

    28-Oct-2025
Total Views |
 
Father murdered
 Image Source:(Internet)
नागपूर :
पारडी परिसरात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागपूर (Nagpur) हादरले आहे. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर मुलानेच स्वतःच्या पित्याचा खून केला असून, गुन्हा केल्यानंतर आरोपीने थेट पोलिस ठाण्यात हजेरी लावून कबुली दिली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, भांडेवाडी येथील रहिवासी पवन आर्मोरिकर उर्फ नेगी याचा आणि त्याच्या वडिलांचा गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होता. सोमवारी मध्यरात्री पुन्हा तीव्र वाद निर्माण झाला. संतापाच्या भरात पवनने तीक्ष्ण हत्याराने वडिलांवर वार करून त्यांचा जागीच खून केला.
 
खून केल्यानंतर पवनने कोणतीही पळवाट न शोधता थेट पारडी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला, याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे पारडी परिसरात भीतीचं आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.