दिवाळीनंतर महाराष्ट्रात राजकीय हलचाल; राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चर्चा रंगल्या

    23-Oct-2025
Total Views |
 
Raj and Uddhav Thackeray
 Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) पुन्हा एकत्र येऊ शकतात. मागील ३-४ महिन्यांत दोन्ही बंधूंनी सात-आठ वेळा भेट घेतली असून, या संवादातून राजकीय रणभूमीत नवा रंग उमटला आहे.
 
दोन दशकांहून अधिक काळ एकमेकांपासून दूर राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या भेटींचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडतो आहे. जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीसोबत उभे राहिले, तर महाविकास आघाडीला भरपूर ताकद मिळेल, अशी अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
तथापि, राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील संभाव्य सहभागावर काँग्रेसमधील काही नेत्यांनी विरोध केला आहे. विशेषतः वर्षा गायकवाड आणि भाई जगताप यांनी या युतीला विरोध दर्शवला आहे. मनसेकडून काँग्रेसवर टीका होत आहे, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने या विरोधाला फारसा महत्त्व दिलेला नाही.
 
सध्या ठाकरे बंधूंच्या भेटी नियमित झाल्या आहेत. चार दिवसांपूर्वी राज ठाकरे कुटुंबासहित शिवतीर्थावर गेले, तर नंतर उद्धव ठाकरें मातोश्रीवरून थेट राज ठाकरेच्या निवासस्थानी भेटीस गेले. गेल्या तीन महिन्यात तब्बल ९ वेळा ठाकरे बंधूंनी भेट घेतली आहे.
 
राजकीय विश्लेषकांचा अंदाज असा आहे की, दिवाळीनंतर ठाकरे बंधू मोठा निर्णय जाहीर करू शकतात. मराठी राजकारण आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित ही युती भविष्यातील निवडणुकीच्या रणनितीत मोठा बदल घडवून आणू शकते.