दिवाळीच्या रात्री नागपुरात लागल्या सलग सहा आगी; शहरात खळबळजनक परिस्थिती!

    22-Oct-2025
Total Views |
 
Diwali continuous fire broke
 Image Source:(Internet)
नागपूर :
दिवाळीच्या आनंदात बुडालेल्या नागपूरकरांना (Nagpur) काल रात्री आगीनं चांगलंच धाडकावून दिलं. शहरातील विविध भागांमध्ये तब्बल सहा ठिकाणी लागलेल्या आगींनी नागपूर हादरले. सर्वात गंभीर घटना आठरस्ता चौकाजवळील रिलायन्स स्मार्ट स्टोअरमध्ये रात्री सुमारे ९ वाजता घडली. अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच स्टोअरमधील सर्व सामान ज्वाळांच्या विळख्यात घेतले.
 
अग्निशमन दलाने तीन तासांच्या झटापटीनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु दुकानातील संपूर्ण माल नष्ट झाल्याने मोठ्या आर्थिक तोट्याची नोंद झाली आहे.
 
शहरातील इतर भागांतही कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आणि झाडांना लागलेल्या छोट्या आगींच्या घटना नोंदल्या गेल्या. अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद देत सर्व आगी वेळेत विझवून मोठा अनर्थ टाळला.
 
फलटण रोडवरील एका स्क्रॅप गोडाऊनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला. आगीचे लोट गोडाऊनभर पसरले आणि हवेत काळ्या धुराचे लोट दिसू लागले. स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. जवानांनी दीर्घ प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
 
या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र मोठ्या प्रमाणात स्क्रॅप साहित्य जळून खाक झाले. आगीचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
साय बाजार इमारतीच्या मागे असलेल्या गोडाऊनमध्ये मध्यरात्री आग लागून परिसरात धावपळ उडाली. प्रारंभी एका गोडाऊनमध्ये लागलेली आग काही वेळातच शेजारच्या तीन गोडाऊनमध्ये पसरली. एकूण चार गोडाऊन पूर्णतः जळून खाक झाले.
 
वसई-विरार अग्निशमन दलाच्या ताफ्याने तीन फायर इंजिन घटनास्थळी पाठवून अनेक तास प्रयत्नांनंतर आग विझवली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कोट्यवधी रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
 
या सलग लागलेल्या आगींमुळे नागपूर, बारामती आणि नालासोपारा परिसरात दिवाळीचा आनंद काळवंडला, तर प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.