Image Source:(Internet)
मुंबई:
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. राऊतांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला “बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर” असल्याचा आरोप केला.
ठाकरे बंधूंच्या युतीवर वक्तव्य-
संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना कोणत्याही मुहूर्तावर नव्हती; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युती जाहीर करतील, तेच खरी ताकद आहे. दसऱ्याला फक्त दोनच मेळावे खरे महत्त्वाचे आहेत .एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा. उर्वरित इतर मेळावे दसरा म्हणण्यासारखे नाहीत.
मोदी-शहा यांच्यावर थेट हल्ला-
यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “चोर बाजारात माल विकला जातो; दिल्लीतदेखील राजकारणाचा चोर बाजार चालतो. मोदी आणि शाह यांनी तिसरा चोर बाजार उघडला आहे, ज्यात राजकारणाचा ‘चोरीचा माल’ विकला जातो. जनता त्याला मान्यता देत नाही.”
शिंदे गटावर घणाघाती टीका-
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर बोलताना राऊत म्हणाले, “प्रचंड पैसा वापरून लोक मेळाव्यावर आणले जातील. अरे, तुम्ही कोण? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कुठे होते? कुठल्या गोधडीत मुतत होता? जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शिवसेनेची स्थापना केली, तर जन्माचे दाखले घेऊन या. शिंदे गट म्हणजे मोदी-शहांचा उपकंपनी, बेनामी कंपनी आहे. मी त्यांना पक्ष मानत नाही. त्यांच्या अस्तित्वाची वेळ पावसाळ्यातील गांडुळ्यांसारखी आहे.”
दसरा मेळावे आणि राजकीय वाद-
दरम्यान, शिवसेनेतील फूटानंतर शिंदे गटाने आपले दसरा मेळावे सुरु केले आहेत. आझाद मैदानावर त्यांच्या मेळाव्याचे आयोजन झाले होते, पण यावर्षी पावसामुळे ते ठिकाण बदलण्यात आले आहे. उद्धव