(Image Source : x/@yadavakhilesh)
प्रयागराज :
प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्यात मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी-बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्रिवेणी संगम काठावर चेंगराचेंगरी (Mahakumbh 2025 Stampede) झाली. चेंगराचेंगरीमुळे 15 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 50 हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. संगमाजवळील बॅरेज तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. जखमींना उपचारासाठी मेळा भागातील सेंट्रल रुग्णालयासह प्रयागराजच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाकुंभात झालेल्या घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगम काठावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या (Mahakumbh 2025 Stampede) घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, प्रयागराज महाकुंभमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्या भक्तांनी आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांच्याप्रती माझ्या मनापासून संवेदना. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजी यांच्याशी बोललो आहे आणि मी राज्य सरकारच्या सतत संपर्कात आहे.
भाविकांना अफवांवर लक्ष देऊ नये - योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाकुंभात निर्माण झालेल्या स्थितीचा (Mahakumbh 2025 Stampede) आढावा घेत असून त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या बचाव आणि मदतकार्यावर चर्चा केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना संयम बाळगण्याचे (Mahakumbh 2025 Stampede) आवाहन केले आहे. तसेच त्यांनी भाविकांना त्यांच्या जवळच्या घाटावर स्नान करण्याचे आवाहन केले आहे आणि संगम नाक्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि त्यांना सहकार्य करा. त्यांनी कोणत्याही अफवांवर लक्ष न देण्यास सांगितले आहे, असे योही आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे महाकुंभाच्या परिस्थितीवर सतत लक्ष
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभाच्या परिस्थितीवर (Mahakumbh 2025 Stampede) सतत लक्ष ठेवून आहेत. महाकुंभ 2025 साठी स्थापन करण्यात आलेल्या वॉर रूममध्ये मुख्य सचिव, डीजीपी, प्रधान सचिव-गृह, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आणि एडीजी कायदा आणि सुव्यवस्था उपस्थित आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
प्रयागराजमध्ये 8-10 कोटी भाविक उपस्थित
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराजमधील सद्यस्थितीची माहिती देताना म्हणाले की, प्रयागराजमध्ये आज सुमारे 8-10 कोटी भाविक उपस्थित आहेत. संगम नाक्याकडे भाविकांची ये-जा सुरू असल्याने सतत ताण पडत आहे. आखाडा मार्गावरील बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न करताना काही भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काल रात्री मौनी अमावस्येचा मुहूर्त सुरू झाल्यापासून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. पंतप्रधानांनी आतापर्यंत चार वेळा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील सतत परिस्थितीचा (Mahakumbh 2025 Stampede) अहवाल घेत आहेत.
प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात
प्रयागराजमधील परिस्थिती (Mahakumbh 2025 Stampede) नियंत्रणात असली तरी गर्दीचा आकार मोठा आहे. वेगवेगळ्या आखाड्याच्या संतांनी नम्रपणे सांगितले आहे की, भक्तांनी आधी पवित्र स्नान करावे आणि एकदा गर्दी कमी झाली की आखाडे पवित्र स्नानासाठी पुढे जातील. संगम नाक्यावर, नाग वासुकी मार्ग आणि संगम मार्गावर मोठी गर्दी असते. मी भाविकांना आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. संपूर्ण कुंभ परिसरात घाट बनवण्यात आले आहेत, भाविकांना केवळ संगम नाक्यावर जाण्याची गरज नाही. भाविकांनी जवळच्या घाटांवर पवित्र स्नान करावे. आम्ही जखमींना योग्य वैद्यकीय उपचारांची खात्री देत आहोत. भाविकांना त्यांच्या संबंधित स्थळी परतण्यासाठी रेल्वेने प्रयागराज भागातील विविध स्थानकांवरून विशेष गाड्यांचे आयोजन केले आहे.
संगम नाक्यावर सर्वसामान्यांचा प्रवेश बंद
अपघातानंतर 70 हून अधिक रुग्णवाहिका संगम तीरावर पोहोचल्या. जखमी आणि मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर एनएसजी कमांडोंनी संगम तीरावर पदभार स्वीकारला. संगम नाक्यावर सर्वसामान्यांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. गर्दी आणखी वाढू नये म्हणून प्रयागराजला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये भाविकांना थांबवण्यात आले आहे. तेथे प्रशासन सतर्क झाले आहे.
आज संगमसह 44 घाटांवर 8-10 कोटी भाविक करतील अमृतस्नान
आज महाकुंभात मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर अमृतस्नान असून यानिमित्त प्रयागराजमध्ये सुमारे 10 कोटी भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत संगमसह 44 घाटांवर 8 ते 10 कोटी भाविक स्नान करतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अखिलेश यादव यांच्याकडून महाकुंभ चेंगराचेंगरीबद्दल दु:ख व्यक्त
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुम्भट झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल (Mahakumbh 2025 Stampede) दु:ख व्यक्त केले आहे. X वर पोस्ट करत ते म्हणाले की, महाकुंभातील गोंधळामुळे झालेल्या अपघातात भाविकांच्या मृत्यूचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या श्रद्धांजली!
आम्ही आमच्या सरकारला आवाहन करतो की, गंभीर जखमींना (Mahakumbh 2025 Stampede) एअर ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने जवळच्या सर्वोत्तम रुग्णालयात नेऊन तातडीने वैद्यकीय व्यवस्था करावी. मृतांच्या मृतदेहांची ओळख पटवून ते त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करून त्यांच्या निवासस्थानी पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच विभक्त झालेल्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी जलद प्रयत्न केले पाहिजेत. हेलिकॉप्टरचा योग्य वापर करून देखरेख वाढवली पाहिजे. सत्ययुगापासून सुरू असलेली 'शाहीस्नान'ची अखंड आणि अमर परंपरा कायम ठेवत, मदतकार्याच्या समांतर सुरक्षित व्यवस्थापनात 'मौनी अमावस्येचे शाही स्नान' आयोजित करण्याची व्यवस्था करावी.
आम्ही भाविकांना या कठीण काळात संयम बाळगून आपली यात्रा शांततेत पूर्ण करण्याचे आवाहन करतो. आजच्या घटनेतून (Mahakumbh 2025 Stampede) धडा घेऊन शासनाने भाविकांची राहण्याची, निवास, भोजन, पाणी व इतर सुविधांची अतिरिक्त व्यवस्था करावी. अपघातातील सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना आहे, असे अखिलेश यादव म्हणाले.