ग्रामीण भागातील बंद पडलेल्या बस फेऱ्या पुर्ववत करा !

    27-Jul-2024
Total Views |
-युवा मित्र मंडळ पुसला तर्फे वरूड आगार व्यवस्थापकांना निवेदन

Yuva Mitra Mandal 
 वरूड:
वरुड एस बस डेपोमधून ग्रामीण भागात विविध ठिकाणच्या बस फे:या बंद करण्यात आल्या आहे. ज्यामूळे नागरिकांना प्रवास करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामूळे तातडीने या बस फे:या पुर्ववत सुरु करण्याची मागणी पुसला येथील युवा मित्र मंडळाकडून करण्यात आली आहे. याकरिता वरुड आगार व्यवस्थापकांना एक निवेदन देण्यात आले.
 
वरुड येथून पुसला मार्गे जाणाऱ्या सावंगी, लिंगा व इतर बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाश्यांना व विद्यार्थ्यांना प्रवास करण्याकरिता मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व बस फेऱ्या सुरू करा, अश्या मागणीचे निवेदन युवा मित्र मंडळाकडून देण्यात आले आहे. यावेळी युवा मित्र मंडळ पुसला अध्यक्ष सूरज धर्मे, सहसचिव धिरज सावरकर, प्रमोद पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.