कारगिल युद्ध स्मारकाला भेट देत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर साधला जोरदार निशाणा

    26-Jul-2024
Total Views |
PM Narendra Modi
(Image Source : tw/@narendramodi)
 
एबी न्यूज नेटवर्क :
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 25 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकाला भेट देली. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
 
 
25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्ध स्मारकाला भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी युद्ध स्मारकावर पोहोचले आणि त्यांनी जवानांना संबोधित केले. १९९९ च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांचे स्मरण करून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'पाकिस्तानने याआधी जे काही चुकीचे कृत्य केले आहे, त्याला नेहमीच चोख प्रत्युत्तर मिळाले आहे, परंतु पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही. दहशतवाद आणि प्रॉक्सी वॉरच्या मदतीने ते स्वतःला सुसंगत बनवण्याचा प्रयत्न करत आहे.'
 
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज मी अशा ठिकाणाहून बोलत आहे जिथे दहशतवाद्यांचे धनी माझा आवाज थेट ऐकू शकतात, मला या दहशतवादाच्या समर्थकांना सांगायचे आहे की, त्यांचे नापाक इरादे कधीच सफल होणार नाहीत. आमचे जवान संपूर्ण ताकदीने दहशतवादाचा मुकाबला करतील आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर देतील.'
 
भारत सरकारकडून जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये रणनीतीच्या दृष्टीने अनेक बोगदे बांधले जात आहेत. हा संपूर्ण परिसर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. नवीन बोगद्यांच्या निर्मितीमुळे एलओसी आणि एलएसीवरील लष्कर आणि इतर निमलष्करी दलांची हालचाल अधिक सुलभ होत आहे. या बोगद्यांमुळे कोणत्याही मोसमात लष्करी उपकरणे आणि सैनिकांच्या वाहतुकीला अडसर येणार नाही. याशिवाय प्रादेशिक विकासाला चालना देखील मिळत आहे.