टोल प्लाझा होणार बंद; 'ही' प्रणाली होणार सुरु

    26-Jul-2024
Total Views |
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय
 
Toll plaza will be closed
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार टोल बंद करून लवकरच सॅटेलाइट आधारित टोल कलेक्शन प्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून टोल कलेक्शन वाढवणे आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
 
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) कार्यान्वित करणार आहे. मात्र, ही व्यवस्था सध्या केवळ काही निवडक टोल प्लाझांवरच सुरू होईल. यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी म्हणाले होते, आता आम्ही टोल प्लाझा बंद करत आहोत आणि सॅटेलाइटच्या माध्यमाने टोल वसूल केला जाईल. आपल्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि आपण जेवढे अंतर कापाल, त्यानुसार पैसे घेतले जातील. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होईल, असे गडकरी आपल्या लेखी पत्रात म्हणाले आहे.