श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

    26-Jul-2024
Total Views |
School celebrated Guru Poornima
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींची शाळा, महाल येथील प्रांगणात आषाढी एकादशी वारी निमित्‍त विठू नामाचा गजर करण्‍यात आला. छोट्या छोट्या माऊलींच्या दिंडीने शाळारूपी मंदिराला विद्यार्थ्‍यांनी प्रदक्षिणा घातली. विठूनामाच्या गजरात शाळेच्या प्रांगणात दिंडीचे स्वागत झाले. तसेच, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षक व पालकांचे पाद्यपूजन करण्यात आले.
 
कार्यक्रमाला सतीश चाफेकर, पालक प्रतिनिधी मालती नानोटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे उपमुख्याध्यापक सुबोध आष्टीकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग दिंडीत सामील झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल बाविस्कर यांनी केले.