जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी

    26-Jul-2024
Total Views |
: शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ravindra Shinde demand to CM
 (Image Source : Internet)
राजुरा:
जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरीप हंगामातील पिके बहरत असताना अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रातील पीक जलमय होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
 
जिल्ह्यातील कोळसा खाणी आणि महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे आधीच प्रदूषणाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. शेत पिकांवरही प्रदूषणाचा परिणाम होत असून, उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. शासन स्तरावर या समस्येचा विचारही गांभीर्यपूर्वक करून या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्यासंततधार पावसामुळे शेत पिकांची अतोनात हानी झाली आहे.
 
कोळसा खाणींच्या ओव्हर बर्डनमुळे नदी व नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह अडचणीत आले आहे. यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. पिडीत शेतकऱ्यांकडून वेकोलिला वेळोवेळी निवेदने देऊनही कुठल्याही प्रकारची उचित कार्यवाही झाली नसल्याने ही पूर परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करीत आहे. यामु नुकसानग्रस्त शेतकरी बांधावां वेकोलिकडूनही नुकसान भरपा देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.