उद्धव ठाकरेंचा अभ्यास अर्थसंकल्पावर नाही...; नारायण राणेंचा घणाघात

    26-Jul-2024
Total Views |
Narayan Rane criticizes Uddhav Thackeray
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला.यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले होते. यावर भाजप खासदार नारायण राणे पटलावर केला आहे.
 
उद्धव ठाकरेंचा अभ्यास अर्थसंकल्पावर नाही हे त्यांनी स्वतःच एकदा सभेमध्ये सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला काही अर्थ नाही, असे राणे म्हणले. भाजप प्रदेश कार्यालय ,नरिमन पॉईंट मुंबई येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
 
उद्धव ठाकरे यांना बजेट वाचायचं असेल तर मी टिपण देईन. प्रत्येक योजनेंतर्गत एक बजेट आहे. राज्याला योजना दिल्या जातात.सर्व योजना राज्यात आहेत आणि मोदी सरकारने दिल्यात. अज्ञानी राहुल गांधी बजेटवर बोलले. आम्ही बजेट मांडून लोकांना लाभ दिला. तुम्ही तर राजकोषीय तूट वाढवून दाखवली, असेही नारायण राणे यांनी नमूद केले.