सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, मेन्टेनन्सचे निशुल्क प्रशिक्षण; अर्ज करण्याचे आवाहन

    26-Jul-2024
Total Views |
 
solar panel
 (Image Source : Internet/ Representative)
अमरावती:
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ व नॅशनल एससीएसटी हब पुरस्कृत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी सोलर पॅनल इन्स्टॉलेशन ॲण्ड मेन्टेनन्सवर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन दि. 30 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणाच इच्छुक उमेदवारांनी प्रवेश अर्ज दि. 26 जुलैपर्यंत सादर करावे, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
 
प्रशिक्षणासाठी उमेदवार हा किमान दहावा वर्ग उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवार 18 ते 45 वयोगटातील असावा. तो अमरावती विभागातील रहिवासी असावा. आयटीआय, पॉलीटेकनिक, विज्ञान व अभियांत्रिकी पदवीधर यांना प्राध्यान्य राहील. सदर प्रशिक्षण कार्यक्रम निशुल्क असून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे दि. 29 जुलै 2024 रोजी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शकाद्वारे सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, दुरुस्ती, आवश्यक तांत्रिक प्रॅक्टिकलसह थेअरीद्वारे सविस्तर माहिती दिली जाणार असून उद्योजकता विकास विषयाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
 
अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक स्वप्नील इसळ (8788604226) तसेच प्रकल्प अधिकारी राजेश सुने (7507747097) किंवा महाराष्ट्र उदयोजकता विकास केन्द्र, टांक चेम्बर, गाडने नगर अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे. सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, मेन्टेनन्सचे निशुल्क प्रशिक्षण; अर्ज करण्याचे आवाहन