पॅरोलवर फरार कैदी पुन्हा जेरबंद

    26-Jul-2024
Total Views |
- भातकुली पोलिसांची कारवाई

parole reimprisoned (Image Source : Internet/ Representative)
अमरावती :
मध्यप्रदेशातील होशांगाबाद कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेल्या एका फरार कैद्याला पुन्हा जेरबंद करण्यात आले. तिवारी दामू इवने (30, रा. सायखेड बैतुल, मध्यप्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या कैदीचे नाव आहे. भातकुली पोलिसांनी 24 जुलै रोजी कामगिरी केली.
 
भातकुली पोलिसांना माहिती मिळाली होती की, मध्यप्रदेशातील होशांगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी तिवारी दामू इवने हा पॅरोलवर बाहेर आला आणि पॅरोल संपल्यानंतरही तो कारागृहात परत गेला नाही. तो फरार झाला असून, सद्यास तो भातकुली येथे फिरत आहे. या माहितीवरून भातकुलीचे पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे, पोलिस हवालदार राजेश बोरकुटे, सागर चव्हाण, चालक अजय मालकुटे यांनी आरोपी तिवारीचा शोध सुरु केला. दरम्यान 24 जुलै रोजी भातकुली पोलीसांनी आरोपी तिवारी इवनेला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला मध्यप्रदेश पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नविनचन्द्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.