दहावी, बारावीची 26 जुलै रोजी होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलली; 'या' दिवशी होणार परीक्षा!

    26-Jul-2024
Total Views |

10th and 12th supplementary exams on July 26 postponed
(Image Source : Internet/ Representative) 
नागपूर :
राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या (शुक्रवारी, २६ जुलै २०२४) होणारी दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली.
 
१० साठी २६ जुलै रोजी होणारी विज्ञान व तंत्रज्ञान भाग २ ही परीक्षा ३१ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मंडळाने आज जारी केलेल्या अधिकृत सूचनेत दिली. परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ अशी आहे. त्याचप्रमाणे बारावीसाठी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट, फूड सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी आणि एमसीव्हीसी या तीन विषयांची परीक्षा आता ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
 
एमएसबीएसएचएसईनुसार, उर्वरित परीक्षांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. तसेच पावसामुळे गुरुवारी झालेल्या परीक्षेला उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसण्याची मुभा देण्यात येईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. दहावीची पुरवणी परीक्षा मुळात १६ ते ३० जुलै दरम्यान होणार होती, तर बारावीची परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार होती यावर्षी नियमित दहावी बोर्ड परीक्षा १ मार्चपासून सुरू झाली आणि २६ मार्च २०२४ रोजी संपली, ज्यात १५ लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. महाराष्ट्र एसएससी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दुसरी शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली.