आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कमठीतील तरुणाला अटक

    25-Jul-2024
Total Views |

Young man from Kamthi arrested
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आरोपी तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. शारीरिक संबंध ठेवताना आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले. सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोपीचे हे कृत्य पीडित मुलीला समजताच तिने नवीन कामठी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. शुभम नितनवरे (वय 22, रा. विकटबाबा नगर कामठी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमने २२ वर्षीय तरुणीशी मैत्री केली आणि तिला प्रेमात अडकवले. यानंतर आरोपीने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान त्याने अतिशय हुशारीने मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो काढून त्याचा व्हिडीओ बनवला.तसेच सोशल मीडियावर व्हायरल केला. 22 जुलै रोजी मुलीला हा प्रकार समजल्यानंतर तिने घरच्यांशी चर्चा केली. यानंतर आरोपी विरोधात पीडित मुलीने कामठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.पोलिसांनी आरोपी शुभमला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.