श्री साईनाथ कॉन्व्हेंट ॲण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये वृक्षसंवर्धन अभियान

    25-Jul-2024
Total Views |
 
Shri Sainath Convent and Junior College
 
वाडी :
श्री साईनाथ कॉन्व्हेंट ॲण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये राज्य शासनाच्या शिक्षण सप्ताहाच्या अनुषंगाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम संस्थेचे डायरेक्टर शशांक शेखर, सरपंच गजानन रामेकर, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
 
परिसरात औषधी युक्त झाडाचे रोपण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. वृक्ष व पर्यावरण या विषयावर अक्षरा इखणकर, कृष्णा शुक्ला, ख़ुशी पटले, सिमरन या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून विचार मांडले. के.जी. विभागाच्या मुलांनी वृक्ष बचाव चा नारा देत एक नाटकाचे प्रस्तुती करण केले. वर्ग पहीलीच्या मुलांची फॅन्सी ड्रेस प्रतियोगिता घेण्यात आली.
 
कार्यक्रमाचे नेतृत्व शिक्षिका राखी रंगारी यांनी तर संचालन शिक्षिका स्नेहा पारधी यांनी केले. आयोजनासाठी शिक्षिका शुभांगी पाखरे, अंकिता चारबे, मनीषा चौधरी, हर्षा राजूरकर, स्मिता पाचघरे, अश्विनी कापसे, कोमल डोंगरे, मयुरी डुले, हिमांशू गाढवे, मयुरी शिंगारे, पायल डहाके, प्रांजली उगवेकर, रम्या वोटला, ज्योती शेंडे, प्रतीक्षा केचे, संगीत शिक्षक विनायक कराडे, सुरज शेंडे, उमेश सिंग, मोहिनी बहादुरे, अजय गायकी, मीना हिवसे, सुनंदा मोहोड, प्रफुल्ला लकडा, दिक्षा गजभिये आदींनी सहकार्य केले.