अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्रावर रोष!

    25-Jul-2024
Total Views |
 - राष्ट्रवादीचा आरोप
 
- केदार चौक परिसरात निदर्शने

Kedar Chowk area (Image Source : Internet)
वरुड :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासारख्या प्रमूख राज्यासाठी काहीच भरीव तरतूद करण्यात आली नाही. केवळ सत्ता टिकावी म्हणून बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी मोठ्या निधीची घोषणा केली, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने करित बुधवारी केदार चौकात निदर्शने केली आणि मोदी सरकारचा निषेध केला. हे महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पाचा निषेध आंदोलन असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शहराध्यक्ष डॉ. प्रवीण चौधरी म्हणाले.
 
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अधिक विकसित करण्यासाठी आर्थिक तरतूद असणे अपेक्षित होते. महाराष्ट्रातील नव्हेतर इतर राज्यातील युवकांना रोजगार देणाऱ्या महाराष्ट्रात रोजगार निर्मिती व्हावी म्हणून उद्योगांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. सर्वांधिक शेतकरी आत्महत्या विदर्भात झाल्या आहेत. कृषी साहित्य, बी-बियाणे महाग झाले आहेत. त्यावरील अधिक सुट देणे अपेक्षित होते. शिवाय शेतीमालास चांगला भाव मिळेल, यासाठी तरदूत करायला हवी होती. परंतु केवळ केंद्रात सत्ता टिकून रहावी म्हणून बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी भरीव निधी दिला आहे. तेथे खासगी कंपन्यांमार्फत पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. अशाप्रकारे खासगी कंपन्यांना लाभ देण्यात येत आहे. तर महाराष्ट्राला काहीही देण्यात आलेले नाही. याचा आम्ही निषेध करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष राजेंद्र बहुरूपी म्हणाले.
 
यावेळी कार्यकर्त्यांनी अर्थसंकल्पात एकच दोष 'महाराष्ट्रावर रोष.. महाराष्ट्रावर रोष..' अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष डॉ. प्रवीण चौधरी, तालुकाध्यक्ष राजेंद्र बहुरूपी, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, नगरपरिषद माजी उपाध्यक्ष महेंद्र देशमुख, जितेन शाह, डॉ. विजय देशमुख, संजय कानुंगो, समीर अली, युवा तालुकाध्यक्ष हर्षल गलबले, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर यावले, युवाजिल्हा उपाध्यक्ष सुरज वडस्कर, माजी नगरसेवक संजय डफरे, योगेश दुपारे, हिराकांत उईके, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.