पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांची महाबँकेला भेट

    25-Jul-2024
Total Views |

Padmashri Shankar Baba Papalkar visits Mahabank
 
 
अमरावती :
जिल्ह्यातील वझर येथील 123 अनाथ मुलांचा सांभाळ करणारे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती क्षेत्रीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी अमरावती झोनचे झोनल मॅनेजर उमेश पराते यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्राहक या नात्याने शंकरबाबा पापळकर यांनी बँकेच्या विविध योजनांची तसेच बँक ऑफ महाराष्ट्राच्या अमरावती शहरातील व इतरत्रही असणाऱ्या सर्व शाखा बद्दल माहिती घेतली. तसेच बँकेच्या विविध योजना व विविध कर्जाविषयी जाणून घेतले. बँकेने ग्राहकांच्या सेवेकरता आणलेल्या नवनवीन योजना विशेष डिपॉजिट स्कीम तसेच गृह कर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज आणि इतर कर्जाच्या आकर्षक व्याजदरांमुळे ग्राहकांना होणारा फायदा याबद्दल बँकेचे शंकरबाबा पापळकर यांनी कौतुक केले. बँक ऑफ महाराष्ट्र चे ब्रीदवाक्य ‘एक कुटुंब एक बँक’ याप्रमाणे कुटुंबातील तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत कुटुंबातील प्रत्येकासाठी असणाऱ्या या योजनेचे कौतुक केले. याप्रसंगी शंकरबाबा पापळकर यांनी संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधला. उप प्रबंधक हिमांशू लांबाते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.