कुख्यात गुन्हेगार मख्खीवर एमपीडिए

    25-Jul-2024
Total Views |
crime
 (Image Source : Internet/ Representative)
अमरावती :
शहरातील कुख्यात गुन्हेगार भारत उर्फ मख्खी अर्जुन घुगे (25, रा. शिवमंदीर जवळ, विलास नगर, अमरावती) याच्याविरुध्द एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून, त्याला 24 जुलै रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.
 
भारत घुगे हा 2019 पासून गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याच्याविरूध्द गाडगेनगर, सिटी कोतवाली, फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे, अश्लील शिवीगाळ करणे, नुकसान करणे, खून, गृह अतिक्रमण करणे, जबर दुखापत घडवुन आणण्याचा प्रयत्नासहीत जबरी चोरी करणे, अनुसुचित जाती जमाती कायदा, अवैध शस्त्र बाळगणे, विनयभंग करणे, महिलेशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी करणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, अवैधरित्या दारू विक्री करणे, हद्दपार आदेशाचे उल्लघंन करणे, अधिसुचनांचे उलघंन करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण 12 गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच त्यास तडीपार सुध्दा करण्यात आले होते, तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला. त्यांनी पोलिस उपायुक्त सागर पाटील व सहायक पोलिस आयुक्त अरूण पाटील यांच्यामार्फतीने पाठविलेल्या प्रस्तावाची सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे व पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्फत पूर्तता केली.
 
सदर प्रस्तावावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी 24 जुलै रोजी आदेश पारीत केले. या आदेश तामिल करून आरोपीला स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृह दाखल करण्यात आले आहे. या पुढेही शहरातील अभिलेखावरील अवैध दारू विकी, गांजा विक्री करणारे व इतर गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई करण्यात येणार आहे.