मानसेवी होमगार्डची सदस्य नोंदणी

    25-Jul-2024
Total Views |
- 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले
 
Member Registration of Mansevi Home Guard
(Image Source : Internet/ Representative)
 
अमरावती :
जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्यातर्फे मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, चांदुर रेल्वे व धारणी येथे सुरू करण्यात आली आहे. यातील 141 पदांसाठी पुरुष आणि महिला होमगार्ड सदस्य नोंदणी 26 ऑगस्टपासून जिल्हा होमगार्ड, अमरावती येथे होत असून मैदानी चाचणी संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे होणार आहे. होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी 31 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी केले आहे. मैदाणी चाचणी संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे सकाळी 5 वाजेपासुन होणार आहे.
 
होमगार्ड नोंदणी पात्रतेचे असे आहेत निकष
उमेदवार दहावी असावा, वय वर्ष 20 ते 50 वयोगटातील, उंची पुरुष होमगार्डकरीता 162 सेंमी व महिलासाठी 150 सेंमी असावी, संबंधित उमेदवारास निर्धारीत केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी द्यावी लागेल. निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असल्याचे कार्यालयाचे अथवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस चारित्र पडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे शारिरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्र धारक व इतर अन्य तपशीलाच्यापुष्ट्यर्थ सर्व संबंधीत प्रमाणपत्रे सादर बंधनकारक राहील. उमेदवारास नोंदणीच्या वेळी त्याना स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्या वेळी कोणतीही अपघाती घटणा घडल्यास त्याची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील. उमेदवाराची निवड पुर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल. सदस्य नोंदणीसाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या लिंकचा वापर करावा.