आणखी 90 पेक्षा अधिक गुन्हेगारांना समुपदेशन

    25-Jul-2024
Total Views |
 - गुन्हेगारांची यादी केली अपडेट
 
अमरावती  (Image Source : Internet)
 
अमरावती :
शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा व गुन्हेगारांनी गुन्ह्यापासुन परावृत्त करण्यासाठी पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आणखी 90 पेक्षा अधिक गुन्हेगारांना समुपदेशन केले. दुसर्या वसंत हॉल येथे गुन्हेगारांकरीता समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
शहरातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त शरीराविरुध्दचे व मालमत्तेचे गुन्हे करणारे 90 पेंक्षा अधिक गुन्हगारांना वसंत हॉलला बोलविण्यात आले होते. याठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व इतर वैयक्तीक माहिती, रोजगाराचे साधन, त्यांचेवरील दाखल गुन्ह्यांची माहिती, त्यांचे गुन्हेगारी क्षेत्रातील सोबती, त्यांचे सोशल मिडीया बाबतची माहिती तसेच त्यांचे बोटांचे ठसे व फोटो प्राप्त करुन गुन्हेगारांची माहिती अद्यावत करण्यात आली. तसेच ज्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली नव्हती, त्यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली. जे आरोपी पाहिजे होते, अशा गुन्ह्यामध्ये आरोपी ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली.
 
यावेळी पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी गुन्हेगारांना समुपदेशन केले. न्यायालयाकडून मिळालेल्या जमानतीचा योग्यरित्या उपयोग घेवुन उत्कृष्ट सामाजिक जीवन जगावे, गुन्हेगारीचा मार्ग सोडुन दयावा, असा सल्ला दिला. तसेच गुन्हेगारीचा मार्ग न सोडल्यास न्यायालयाकडुन मिळालेली जमानत पुन्हा रद्द करण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच तडीपारी, एमपीडीए, संघटीत गुन्हेगारी कायद्यातर्गंत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही गुन्हेगारांना दिला. सदर समुपदेशन कार्यक्रमात पोलिस आयुक्तांसह पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, गणेश शिंदे, सागर पाटील, एसीपी जयदत्त भंवर, अरुण पाटील, कैलास पुंडकर, शिवाजी बचाटे, गुन्हे शाखा युनिट 1 व 2, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे प्रगटीकरण पथकातील अंमलदार उपस्थित होते.