ख्रिस्तानंदची निहिरा येनुरकर शिष्यवृत्तीस पात्र

    25-Jul-2024
Total Views |
 
Nihira Yenurkar
 
ब्रम्हपुरी :
ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी निहिरा नितीन येनुरकर ही, मागील वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली आहे.
 
निहिराने शहरी सर्वसाधारण गटामध्ये जिल्ह्यातून 23 वा तर शाळेतून दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शाळेच्या प्राचार्य सिस्टर पावना, व्यवस्थापक फादर कुरियन शाळेतील शिक्षकवृंद कर्मचारी तथा शिष्यवृत्तीचे शिक्षक राहुल कोडापे यांना दिले आहे.