केंद्र सरकारला बिहारची पूरस्थिती दिसते महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का? संजय राऊतांचा सवाल

    25-Jul-2024
Total Views |
 
Sanjay Raut
 (Image Source : Internet)
मुंबई :
राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थीत निर्माण झाली आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारला धारेवर धरले.
केंद्र सरकारने 23 जुलैरो जी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात बिहार आणि आंध्र प्रदेश राज्याला भरघोस निधी देण्यात आला. यावरूनच संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
 
 
महाराष्ट्रात भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बजेटमध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी देण्यात आले. या सरकारला महाराष्ट्रतील पुर दिसत नाही का?असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
 
बिहारला 18 हजार कोटी दिले, आम्हाला 18 कोटी तरी द्या, अशी म्हणायची हिम्मत सत्ताधारी नेत्यांमध्ये आहे का?असे ही राऊत म्हणाले आहेत.