बौद्धिक व वैयक्तिक वाढीसाठी परिवर्तन आवश्‍यक - डॉ. नितीन विघ्ने

    24-Jul-2024
Total Views |

Dr Nitin Vighne
 
 
नागपूर :
अनिश्चित परिवर्तन स्वीकारणे म्हणजे नवीन कल्पना आणि दृष्टीकोनांसाठी स्‍वत:ला मानसिकरित्या खुले ठेवणे होय. परिवर्तन हे बौद्धिक आणि वैयक्तिक वाढीसाठी अत्‍यंत आवश्‍यक आहे, असे मत व्यवस्थापन प्रशिक्षक आणि भारतीय वायुसेनेचे माजी क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. नितीन विघ्ने यांनी व्यक्त केले.
 
विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनच्या (व्हीएमए) साप्ताहिक सत्रात ते ‘पॉवरिंग सायकॉलॉजी फॉर टॉवरिंग सक्सेस इन चॅलेंजिंग बिझनेस एन्व्हायर्नमेंट’ या विषयावर बोलत होते.
 
व्यवसायातील बदल आत्मसात केल्याने व्यक्तींना भविष्यातील गरजा आणि सुधारणांसाठी तयार होता येते यावर डॉ. विघ्ने यांनी यावर भर दिला. मानसशास्त्र व्यवसाय पद्धतींना कसे पूरक आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी विविध उदाहरणे दिली. निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्व कौशल्य, प्रभावी संवाद आणि टीम डायनॅमिक्स समजून घेण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.
 
वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात ज्ञान, कौशल्ये आणि योग्य वृत्तीचा केएसए नियम लागू केल्याने पैसा, आदर आणि समाधान- एमआरएस मिळते असे ते म्हणाले. या सत्राचे संचालन अमजद पठाण यांनी केले, तर सत्र प्रभारी अनिल क्षीरसागर होते.